Pune : लखनऊमधून सौरभ त्रिपाठीला अटक, परिक्षेचं कंत्राट देतेवेळी त्रिपाठीची मध्यस्थी : ABP Majha
Continues below advertisement
टीईटीची यावर्षी झालेली परीक्षाही वादाच्या भोवऱ्यात आहे. या वर्षीची टी ई टी ची परिक्षा घेण्याची जबाबदारी ज्या विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे होती त्या कंपनीचा प्रमुख सौरभ त्रिपाठी ला पुणे पोलीसांनी लखनऊमधुन अटक केलीय. सौरभ त्रिपाठी दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पुणे पोलीसांनी अटक केलीय. सौरभ त्रिपाठी ने 2017 साली जी टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेचे परिक्षा घेण्याचे कंत्राट मिळवून देण्यात मध्यस्थाचे काम केले होते. त्यानंतर शिक्षण परिषदेतील अधिकार्यांना हाताशी धरुन त्याने स्वतःची विनर सॉफ्टवेअर नावाची कंपनी सुरु केली. सौरभ त्रिपाठी हा न्यासा कंपनीला परिक्षा घेण्याचे कंत्राट मिळवून देण्यात ही सहभागी होता. न्यासा कंपनीकडे आरोग्य भरतीची परिक्षा घेण्याचे कंत्राट आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Pune Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Sourabh Tripathi Marathi News