Nurses Protest | विविध मागण्यांसाठी आज राज्यातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन
Continues below advertisement
रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी तसेच कंत्राटीकरण करण्यात येऊ नये. रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी. कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी यासह अन्य काही महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यभरात आज परिचारिकांनी आंदोलन केलं. शासनाकडे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपावेतो कुठलीही दखल घेण्यात न आल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन मार्फत आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे.
Continues below advertisement