Pune : Vasant More यांना हटवून मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी Sainath Babar यांची नियुक्ती : ABP Majha
मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्यात आलीय. मशिदीवरील भोंगे हटवण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आलंय. वसंत मोरे यांना हटवून मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आलीय. राज यांच्या भूमिकेनंतर पुण्यातील काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला होता. राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबत आदेशांची अंमलबजावणी करणार नाही अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलं होतं. वसंत मोरे यांना मात्र बैठकीचं निमंत्रण नव्हतं. अखेर वसंत मोरे यांना पदावरून हटवण्यात आल्यानं वसंत मोरे आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.