Laxmi Pujan Special: पुण्याच्या महालक्ष्मीला 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Continues below advertisement
पुण्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात (Mahalakshmi Temple) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला तब्बल १६ किलो वजनाची सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. देवीचे हे सुंदर आणि तेजस्वी रूप पाहण्यासाठी पुणेकरांनी पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. 'सोन्याच्या साडीतल्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्याचा योग दसरा आणि लक्ष्मीपूजनाला जुळून येतो'. वर्षभरात केवळ याच दोन दिवशी देवीला ही खास सोन्याची साडी परिधान केली जाते, त्यामुळे भाविकांसाठी हा एक विशेष क्षण असतो. या सोन्याच्या साडीमुळे देवीच्या मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून, भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement