Worlds Best School Pune पुण्याच्या जिल्हा परिषद शाळेचा सातासमुद्रापार झेंडा,जगात पटकावले पहिले स्थान
Continues below advertisement
पुण्यातील जालिंदा नगर जिल्हा परिषद शाळेने जागतिक स्तरावर बहुमान मिळवला आहे. 'वर्ल्ड्स बेस्ट स्कूल' या स्पर्धेत या शाळेने आधी टॉप टेनमध्ये स्थान पटकावले होते. आता या शाळेने थेट जगात पहिले स्थान मिळवून भारताचा डंका जागतिक पातळीवर वाजवला आहे. लोकसहभागातून ही शाळा उभारली गेली आहे. इथे डिजिटल शिक्षणाचा दर्जा राखला जातो आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने धडे दिले जातात. मुख्याध्यापक वारे गुरुजींनी जालिंदा नगर जिल्हा परिषद शाळेत जे कार्य केले आहे, त्याचे अनुकरण प्रत्येक शिक्षकाने केल्यास शासकीय शाळांमध्ये क्रांती घडू शकते. या शाळेच्या यशाने शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement