Jain Boarding Row: मोहोळ आणि धंगेकर वादानंतर आता जैन बोर्डिंग पुन्हा सुरू

Continues below advertisement
पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग (Jain Boarding) पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामागे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यातील राजकीय संघर्ष महत्त्वाचा ठरला आहे. 'एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा,' अशी कानउघडणी मोहोळांना वरिष्ठांकडून मिळाल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. धर्मादाय आयुक्तांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जमीन विक्रीचा वादग्रस्त करार रद्द करण्याचे आदेश दिल्याने, विद्यार्थ्यांसाठी बंद असलेली ही ऐतिहासिक वास्तू पुन्हा खुली होणार आहे. या जागेच्या विक्रीवरून मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यात रवींद्र धंगेकर यांनी विक्रीला तीव्र विरोध दर्शवत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या वादानंतर आणि जैन समाजाच्या आंदोलनानंतर अखेर संस्थेचे कामकाज पूर्ववत सुरू होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola