Pune Flood Alert | मुळा-मुठा नदीला पूर, Khadakwasla विसर्ग वाढला, अनेक भागांत पाणी, Traffic कोंडी.
पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. ३५ हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आता जवळपास ४० हजार क्युसेकवर नेण्यात आला आहे. यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सिंहगड परिसरातील एकतानगरसह नदीलगतच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. पार्किंगमध्येही पाणी साचले आहे. बाबा बीडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. सिंहगड रस्ता, कात्रज, कोथरूड आणि बालगंधर्व चौकात वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. नांदेडमधील पूर परिस्थितीसारखी स्थिती पुण्यात उद्भवू नये यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे.