Highcourt On Porshe Car Accident : पुणे पोर्शे केसमधील अल्पवयीन आरोपीला मुक्त करा : हायकोर्ट

Continues below advertisement
Highcourt On Porshe Car Accident : पुणे पोर्शे केसमधील अल्पवयीन आरोपीला मुक्त करा : हायकोर्ट


19 मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणा-या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आत्येनं पुतण्यासाठी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. जामीन मिळाल्यानंतरही
 पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता.  मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे. अल्पवयीन मुलाला आत्येच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मुलाचे आई,
वडिल आणि आजोबा  हे सध्या पोलीसांच्या कोठडीत आहे. त्यामुळे मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
आदेशात नमूद करण्यात आले आहे की, 22 मे 2024,  5 जून 2024 आणि 12 जून 2024 चे बालहक्क न्यायालयाचे जे आदेश आहेत, त्यामध्ये विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले होते, त्या अवैध आहेत. त्यामुळे ते आदेश रद्द झाले आहेत. त्यामुळे विधीसंघर्षित बालकाला तातडीने सोडावे लागणार आहे, त्याचा ताबा आत्याकडे देण्यात येणार आहे. आता जे आदेश आले आहेत, त्यामध्ये पोलिसांबाबत काहीही म्हटलेले नाही. 





















































































































































Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram