Ravindra Dhangekar : फडणवीसांनी समज दिल्यानं मोहोळ जैन बोर्डिंग हाऊसमध्ये नतमस्तक - धंगेकर
Continues below advertisement
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding House) जमीन व्यवहारामुळे राजकीय वाद पेटला आहे. 'वरिष्ठांकडून सक्त ताकीद मिळाल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी आज जैन साधूंसमोर गुडघे टेकले, एकतर जैन मंदिर वाचवा किंवा मंत्रीपद वाचवा असे त्यांना सांगण्यात आले', अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. मोहोळ यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले असून, आपण व्यवहाराच्या ११ महिने आधीच संबंधित कंपनीतील भागीदारीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी जागेच्या विक्रीला 'जैसे थे' (status quo) ठेवण्याचा आदेश दिला आहे. हा वाद आता थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला असून, धंगेकर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement