Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 23 OCT 2026 : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमीन व्यवहार प्रकरणी राजकारण तापले असून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत,' असा थेट आरोप धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर केला आहे. दुसरीकडे, कल्याणमध्ये फटाक्यांच्या स्टॉलवरून झालेल्या वादातून दोन गटात राडा झाला, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी संध्या साठे (Sandhya Sathe) यांना मारहाण झाली. याशिवाय, जोगेश्वरी येथील एका इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, इमारतीला ओसी (OC) नसल्याचे समोर आले आहे. तसेच, महायुतीमध्येही धुसफूस सुरू असून मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सुनील तटकरेंना (Sunil Tatkare) 'दोन पाऊलं मागे चला' असा इशारा दिला आहे. दिवाळीनंतर मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली असून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement