Pune Politics : 'चंद्रकांत पाटलांच्या मार्फत माझ्यावर MCOCA लावणार', रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
पुण्यातील (Pune) राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 'चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत समीर पाटील (Sameer Patil) माझ्यावर मोक्का (MCOCA) लावण्यासाठी पोलिसांसोबत तयारी करत आहे', असा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शांत राहण्याचा सल्ला देऊनही धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पाटील यांच्या आजूबाजूला गुन्हेगार वावरत असून पुणे शहरातील गुन्हेगारीला तेच जबाबदार असल्याचा दावाही धंगेकर यांनी केला आहे. गुंड नीलेश घारवार (Nilesh Gharwar) प्रकरणावरून महायुतीत सुरू झालेला हा वाद आता विकोपाला गेला असून, धंगेकरांच्या आरोपांना समीर पाटील पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचे समजते. 'मी सत्य बोलतो, माझा आवाज कुणीही बंद करू शकत नाही', असेही धंगेकर म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement