Pune Police Bharti Protest News : ऐन पावसाळ्यात पोलीस भरती; विद्यार्थी आक्रमक, पुण्यात मोर्चा

Continues below advertisement

Pune Police Bharti Protest News : ऐन पावसाळ्यात पोलीस भरती; विद्यार्थी आक्रमक, पुण्यात मोर्चा

 

Maharashtra Police Bharti: मुंबई : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. कारागृह विभागातील एक हजार 800 पदांसाठी तीन लाख 72 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात 17 हजार 471 जागांसाठी 17 लाखांहून अधिक अर्ज 

राज्यात 19 जून पासून पोलिस भरतीला सुरूवात होतं असून 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज केले आहेत. तुरूंग विभागातील शिपाई या पदाच्या एका जागेमागे सुमारे 207 उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून 1 लाख 98 हजार 300 अर्ज (एका जागेमागे 117) आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत. 9595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण 86 उमेदवार,असं याचं गुणोत्तर आहे. 

शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी 3 लाख 50 हजार 592 अर्ज (एका जागेसाठी 80 उमेदवार) आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित असून शासकिय नोकरीचे आकर्षण आणि अन्य क्षेत्रात घटलेल्या संध्यांच्या पार्श्वभूमिवर अर्ज आले असावेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस पडल्यास त्या विदयार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर उमेदवारानं एका पदासाठी एकदाच फॉर्म भरणं अपेक्षित असून विविध पदांसाठी फॉर्म भरल्यास दोन्ही ठिकाणच्या मैदानी आणि परीक्षेची तारीख एक येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. 

 वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलात 68 रिक्त जागेसाठी एकूण 4 हजार 175 अर्ज

राज्यात रिक्त झालेल्या पोलीस  17,471 रिक्त पदासाठी .  पोलिस भरती होत आहे.  वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलात 68 रिक्त जागेसाठी एकूण 4175 आवेदन अर्ज प्राप्त झाले असून पोलीस मुख्यालय येथील प्रांगणामध्ये पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी 50 अधिकारी आणि 250 कर्मचारी या ठिकाणी उपस्थितीत राहणार आहेत. दिनांक 15 जून रोजी मैदानी चाचणी करीता एकुण 1 हजार उमेदवार असणार आहेत. पावसामुळे मैदानी चाचणी होऊ शकली नाही. तर भरती उमेदवार यांना पुढील सुयोग्य तारीख देण्यात येईल तसेच भरती मधील उमेदवार हे वेगवेगळ्या पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. तसेच, कोणता गैरप्रकार होणार नाही अशी माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram