Traffic Congestion | पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीचा पुन्हा अनुभव, कामगार त्रस्त
पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. चाकणहून पुण्याच्या दिशेने जाताना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या वाहतूक कोंडीमुळे चाकण एमआयडीसीत जाणारे कामगार त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली होती. मात्र, अद्यापही या समस्येवर कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. "या वाहतूक कोंडीतून सुटका करावी," अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. कामगारांना कामावर पोहोचण्यास विलंब होत असून, त्यांना दररोज या समस्येचा सामना करावा लागत आहे. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची आणि या मार्गावरील कोंडी कमी करण्याची गरज आहे. स्थानिक नागरिक आणि कामगार प्रशासनाकडून तातडीच्या उपायांची अपेक्षा करत आहेत.