Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात

Continues below advertisement

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात भारतील शेतकऱ्यांसह सर्वांचं लक्ष मान्सूनच्या पावसाकडे लागलेलं असतं. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून (Monsoon) लवकर भारतात दाखल झाला.  मात्र, महाराष्ट्रातील काही भागात पोहोचल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला होता. आता भारतीय हवामान विभागानं नव्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार 3 जूलैपर्यंत मान्सून देशात पुन्हा आगेकूच सुरु करेल. उत्तर पश्चिम भारतात मान्सूनचा पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये मान्सूची प्रतीक्षा आहे. 11 जून नंतर भारतात मान्सूनचा वेगव मंदावला होता. दोन दिवसांपूर्वी मान्सून मध्य भारताच्या पुढे पोहोचला होता.   पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी " जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पुन्हा गती प्राप्त करेल. त्यावेळी चांगला पाऊस होईल त्यामुळं जूनमध्ये कमी झालेल्या पावसाची जुलैमध्ये भरपाई होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.   पुढील 3-4 दिवसात कुठं पाऊस होणार? भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून पुढील तीन ते चार दिवसात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमधील काही भाग, बिहारचा काही भाग आणि उत्तर प्रदेशातून पुढे जाईल. या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 27 जून नंतर उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट मध्ये ला नीना विकसित होण्याची अपेक्षा आहे. तर, अलनिनोमुळं भारतातील मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम होत असतो. अलनिनो निर्माण झाल्यास भारतात मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात होतो. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram