Stray Dog Menace: 'पुण्यात २.५ लाख भटके कुत्रे', नियंत्रणासाठी PMC आता बसवणार RFID Microchip

Continues below advertisement
पुणे (Pune) शहरातील भटक्या कुत्र्यांची (Stray Dogs) वाढती संख्या आणि नागरिकांवरील हल्ले रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (PMC) एक नवीन मोहीम हाती घेतली आहे. पुणे शहरात जवळपास अडीच लाख भटके कुत्रे असल्याची माहिती असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता RFID तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोचिप (Microchip) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प राबवणारे पुणे हे राज्यातील पहिले शहर ठरणार आहे. ही मायक्रोचिप इंजेक्शनद्वारे कुत्र्याच्या खांद्यावर बसवली जाईल आणि त्यात एक १५-अंकी युनिक क्रमांक असेल, ज्यामुळे स्कॅनरद्वारे त्यांची ओळख पटवून लसीकरण आणि आरोग्यावर लक्ष ठेवणे सोपे होईल. २०२३ च्या गणनेनुसार शहरात १,७९,९४० कुत्रे होते, परंतु ३४ गावे पालिकेत समाविष्ट झाल्याने हा आकडा वाढला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ६०० कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola