Pune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोप
Pune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोप
पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर काल(सोमवारी) पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपयांची रक्कम पकडली होती. जप्त करण्यात आलेली पाच कोटी रक्कमची कोणाची होते, कुठुन आले होते आणि कुठे निघाले होते यांबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्याचे एसपी पंकज देशमुख यांनी याप्रकरणी मोठी माहिती दिली आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ नाकाबंदीमध्ये पकडली ती कार पकडली. आयकर विभाग, निवडणूक आयोग यांच्यासोबत मिळून कारवाई करण्यात आली आहे.
गाडीत सापडलेली रक्कम 5 कोटी रुपये आहेत. याबाबतची माहिती मिळाली होती, त्यानंतर नाकाबंदीमध्ये गाडी सापडली आहे. पैसे आयकर विभागाकडे दिले आहेत.सर्व पैसे तपासून घेतले आहेत, ते फेक नाहीयेत. ज्यांच्याकडे पैसे सापडले ते सांगतायत आम्ही व्यावसायिक आहोत. (रोड बांधकाम व्यावसायिक आहेत) हे पैसे आमचेच आहेत. पैसे कोठून आले आणि कुठे नेले जात होते याबाबत तपास सुरु आहे.मुंबईवरून कोल्हापूरला चालल्याची प्राथमिक माहिती आहे. ठेकेदार म्हणत आहे ते पैसे माझे आहे. त्याने तसा जबाब आयकर विभागाला दिला आहे. राजकीय काही कनेक्शन आहे का याबाबत अधिकचा तपास सुरू आहे.
पैसे सापडलेल्या गाडीचा नंबर MH 45 AS 2526 आहे. ही गाडी आर.टीओकडील नोंदीनुसार अमोल नलावडे यांच्या मालकीची आहे. मात्र, अमोल नलावडे यांनी ही गाडी आपण बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकल्याचा दावा केला आहे. या रकमेसह गाडीमध्ये जे चार जण होते. त्यांना चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे आणि या रकमेचे तपशील इन्कम टॅक्स विभागाकडे जमा करण्यास सांगण्यात आला आहे. मात्र, पोलीस आणि निवडणूक विभागाचे अधिकारी याबाबत अधिकृतपणे माहिती का देत नाहीत हा प्रश्न विचारला जातो आहे. तर या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.