Pune Maratha Wedding: पुण्यात मराठा समाजातील लग्नासाठीची आचारसंहिता? ना राजकारणी ना बडेजावपणा

Pune Maratha Wedding: पुण्यात मराठा समाजातील लग्नासाठीची आचारसंहिता? ना राजकारणी ना बडेजावपणा

वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी सूसगाव येथे प्रेमविवाह झाला होता.घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं. परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. प्रेमविवाह असून देखील वैष्णवीला लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल 51 तोळे सोनं दिलं होतं. त्याचबरोबर फॉर्च्यूनर गाडीही दिली होती. यासह लग्नामध्ये चांदीची भांडी, लग्नानंतर चांदीच्या गौरी मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल, घड्याळे, मागणीनुसार वारंवार पैसे असं बरंच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिलं होतं. तिचं लग्न देखील फारचं थाटामाटात सन्नीज वर्ल्डमध्ये पार पडलं होतं. लग्नामध्ये कोट्यावधींचा खर्च करण्यात आला होता. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांमध्येच तिला त्रास देणं मारहाण करणं छळ करणं सुरू झालं होतं. 

वैष्णवीने तिच्या एका मैत्रिणीसोबत तिच्यासोबत घडलेल्या घटनाबाबत, मारहाणीबाबत आणि छळाबाबत संवाद साधताना तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केल्याचंही सांगितलं. तसेच नणंद देखील बोलते, ती तिच्या नवऱ्याला घटस्फोट देणार असून माझा नवरा कधीच माझा होऊ शकला नाही अशी खंतही व्यक्त केली होती, सासू-सासरे यांच तर तसंच वागणं असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळं बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. ही छोटी गोष्ट आहे असंही तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं. अशातच हगवणे कुटूंबातील इतर सदस्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola