Pune Leopard Attack: 13 वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर Manchar मध्ये एक बिबट्या जेरबंद

Continues below advertisement
पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर (Shirur), जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी (Leopard Attack) दहशतीचे वातावरण आहे. 'सरकारला आता विचार करावा लागेल की बिबटे जगवायचे की माणूस जगवायचे?' असा संतप्त सवाल स्थानिक नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी केला आहे. पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर पुणे-नाशिक महामार्ग (Pune-Nashik Highway) तब्बल १६ तास रोखून धरण्यात आला होता. अखेर मध्यरात्रीनंतर हे आंदोलन स्थगित झाले. वनविभागाने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले असून, त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तैनात आहेत. दरम्यान, मंचर (Manchar) परिसरात एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे, मात्र हाच तो नरभक्षक बिबट्या आहे का, हे तपासानंतर स्पष्ट होईल. वनविभागाने ग्रामस्थांच्या ११ मागण्या मान्य केल्या असल्या तरी, परिसरात अंदाजे १२०० बिबटे असल्याने नागरिकांमधील भीती कायम आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola