Pune Land Scam: 'पार्थ पवारांच्या Amedia कंपनीसाठीच सगळा खटाटोप', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale आणखी अडचणीत

Continues below advertisement
पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) आणि बोपोडी (Bopodi) येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले (Suryakant Yewale) यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमेडिया (Amedia) कंपनीचे नाव समोर आले आहे. एका तहसीलदाराने एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा, असा सवाल उपस्थित करत 'एखादा तहसीलदार एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही', असे मत या प्रकरणातील एका व्यक्तीने व्यक्त केले आहे. कोरेगाव पार्कमधील ४० एकरांची मोक्याची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी येवले यांनी पत्रव्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पॉवर ऑफ अटॉर्नी धारक शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) परदेशात पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. तर बोपोडी येथील सरकारी जमीन प्रकरणातही येवलेंचा सहभाग असल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी बोपोडी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola