Parth Pawar Land Scam : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी फडणवीस अजितदादा काय म्हणाले?
पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, प्राथमिक माहिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, 'माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं काम करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल'. या प्रकरणात सर्व माहिती मागवली असून, लँड रेकॉर्ड्सचीही तपासणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले आहे. तर, आपण कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली आहे.