Pune Land Scam'शेतकऱ्यांना फुकट लागतं म्हणता, तुम्हाला का फुकट हवं?',दानवेंचा अजित पवारांवर थेट सवाल
Continues below advertisement
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) जमिनीच्या व्यवहारावरून राजकारण तापले आहे. शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'अजित पवार एकीकडे म्हणतात शेतकऱ्यांना फुकट लागतं, तुम्हाला का फुकट लागतं? तुमच्या मुलांच्या कंपन्यांना तुम्हाला का फुकट लागतं?' असा थेट सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. सुमारे ४० एकर 'महार वतन' जमिनीचा व्यवहार नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा दावा दानवेंनी केला. जवळपास आठशे ते अठराशे कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला केवळ तीनशे कोटी रुपयांत देण्यात आली आणि मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. दोन दिवसांत कंपनीचा ठराव मंजूर करून जमिनीचे वाटप कसे झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी पार्थ पवारांनी सर्व व्यवहार नियमानुसार असल्याचे म्हटले असले तरी, दानवेंनी या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement