Pune Land Row: 'जमीन हळपावण्याचे प्रकार सुरू', विरोधकांचा आरोप; 'काचेच्या घरात राहत नाही', Fadnavis यांचे प्रत्युत्तर

Continues below advertisement
पुण्यातील (Pune) भाजपच्या (BJP) कार्यालयाच्या जागेवरून नवा वाद पेटला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनाच्या दिवशीच या वादाला तोंड फुटले आहे. 'पुण्यात जैन समाजाची जमीन हडपण्याचे प्रकार काही नेत्यांकडून होत असून, भाजप कार्यालयाची जमीनही वादग्रस्त आहे', असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी, 'भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही, हमारे ऊपर पत्थर फेकण्याचा प्रयास मत करो,' असा थेट इशारा दिला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि पक्षाच्या स्वतःच्या पैशाने ही जागा विकत घेतली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, या प्रकरणात 'बिवलकर' यांच्या नावाचाही उल्लेख झाल्याने आणि सरकार गुंडांच्या पाठीशी असल्याचा आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola