Pune Land Deal: व्यवहार रद्द करायचाय? पार्थ पवारांच्या कंपनीला २१ कोटी मुद्रांक शुल्काची अट
Continues below advertisement
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमीडिया कंपनीला एकवीस कोटींचं मुद्रांक शुल्क भरावं लागेल,' अशी अट सहदुय्यम निबंधकांनी घातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पार्थ पवार यांच्या अमीडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यवहार रद्द करण्याबाबत सहदुय्यम निबंधक कार्यालयात पत्र दिले होते. मात्र, या पत्राला उत्तर देताना, व्यवहार रद्द करण्यापूर्वी २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्याची अट घालण्यात आल्याने प्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement