Pune Land Deal: 'चौकशीनंतर गुन्हा दाखल करू', CM Fadnavis यांचा Parth Pawar प्रकरणी थेट इशारा

Continues below advertisement
पुण्यातील मुंढवा (Mundhwa) येथील वादग्रस्त जमीन गैरव्यवहारप्रकरणी (Land Scam) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही,' असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. या व्यवहारात ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशीनंतर गरज भासल्यास इतरांवरही गुन्हा दाखल केला जाईल, असेही ते म्हणाले. कोणा एकालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही आणि त्याचे काही कारणही नाही, जे झाले आहे ते नियमानुसारच झाले आहे, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. चौकशी सुरू असताना कोणाचा सहभाग आढळल्यास नियमानुसार कारवाई करावीच लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola