Murlidhar Mohol : जैन बोर्डिंग जमीन विक्री: मोहोळ-शेट्टी आमनेसामने, आरोपांच्या फैरी

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding House) जमिनीच्या विक्रीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'पितराच्या घशामध्ये झी आग घालू नका एवढंच आमचं म्हणणं आहे,' असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. मोहोळ यांची गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीत (Gokhale Construction) भागीदारी असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे, तर मोहोळ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'या जमिनींचा माझा काहीही संबंध नाही,' असे मोहोळ यांनी म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ट्रस्टने जमीन विकण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच, म्हणजे २५ नोव्हेंबर २०२४ रोजी, ते संबंधित एलएलपीमधून बाहेर पडले होते. याउलट, 'मंत्री होता येत नाही म्हणून तांत्रिकरित्या बाजूला झाला आहात,' असा दावा करत शेट्टी यांनी मोहोळ यांचा खुलासा फेटाळून लावला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola