BJP vs NCP | कालवा समितीतून समर्थकांना डावललं, खा. निंबाळकरांचा आरोप, जयंत पाटलांकडून कृतीचं समर्थन | ABP Majha
आता बातमी पश्चिम महाराष्ट्र कालवा समितीवरुन सुरु झालेल्या राजकीय खळखळाटाची... काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर रणजितसिंह निंबाळकरांनी निरा देवघर कालव्याचं बारामतीला जाणारं पाणी फलटणकडे वळवलं... आणि आता महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटलांनी पश्चिम महाराष्ट्र कालवा समितीतून निंबळकरांच्या समर्थकांना घरचा रस्ता दाखवलाय. जयंत पाटलांच्या या निर्णयामुळं संतापलेल्या निंबाळकरांनी अजित पवारांकडे तक्रार केलीय. तर जयंत पाटलांनी स्वतःच्या निर्णयाचं समर्थन करताना निंबाळकरांना प्रत्युत्तर दिलंय. तर जयंत पाटलांनी वकिली करु नये असा टोला चंद्रकांत पाटलांनी हाणलाय. दरम्यान आज पुण्यात कालवा समितीची बैठक पार पडली, ज्यात पुण्याला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा आणि जायका प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.