Pune Land Deal: जैन हॉस्टेल जमीन वाद: २३० कोटींवरून धंगेकर-जैन मुनींमध्ये मतभेद Special Report

Continues below advertisement
पुण्यातील जैन हॉस्टेलच्या (Jain Hostel) जागेच्या वादात आता नवे वळण आले आहे. आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि जैन मुनी यांच्यात बिल्डर विशाल गोखले (Vishal Gokhale) यांना दिलेल्या २३० कोटी रुपयांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. 'त्यांनी जे दोनशे तीस कोटी रुपये भरलेत हे शासन याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये कुठून आलेत याची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. दुसरीकडे, जैन मुनींनी मात्र बिल्डरकडून घेतलेले पैसे परत करण्याचा सल्ला ट्रस्टला दिला आहे. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने (Seth Hirachand Nemchand Smarak Trust) मॉडेल कॉलनीतील जागा गोखले बिल्डर्सना २३० कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला धर्मादाय आयुक्तांनी (Charity Commissioner) परवानगी दिली होती. मात्र, या व्यवहारावर आता आक्षेप घेण्यात आल्याने प्रकरण पुन्हा धर्मादाय आयुक्तांपुढे सुनावणीसाठी आले आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार रद्द करण्याची तयारी दाखवली असली तरी, या प्रकरणावर ३० तारखेला होणाऱ्या सुनावणीनंतरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola