Pune Jain Mandir: मंदिर आहे की नाही? याची प्रशासनाकडून तपासणी, स्थानिकांचा गोंधळ

Continues below advertisement
पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी बोलताना एका आंदोलकाने संतप्त प्रतिक्रिया दिली, 'या देशामध्ये हे हास्यास्पद आहे, धर्माच्या राज्यामध्ये मंदिर गायब केलंय'. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने २३० कोटी रुपयांना ही जागा गोखले लँडमार्क एलएलपी नावाच्या कंपनीला विकल्याचा आरोप आहे, ज्यात एक जुने जैन मंदिर आणि वसतिगृह आहे. स्थानिकांच्या मते, या व्यवहारात सुमारे १८० वर्षे जुनी विहीरही गायब करण्यात आली आहे. हा व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी जैन समाजाने भव्य मोर्चा काढला असून, 'मंदिर तोडण्याचा प्रयत्न केल्यास आमरण उपोषण करेन' असा इशाराही देण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणी सध्या 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola