Pune Jain Boarding Case: पुणे जैन बोर्डिंग वाद प्रकरणी सुनावणी 30 तारखेला
Continues below advertisement
पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमिनीच्या वादात आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी गोखले बिल्डर (Gokhale Builder) आणि सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट (Seth Hirachand Nemchand Digambar Jain Boarding Trust) यांच्यात सुरू असलेल्या वादावर आता लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार असून, दोन्ही पक्ष धर्मदाय आयुक्तांसमोर (Charity Commissioner) प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत. त्यानंतर आयुक्त यावर आपला निकाल देतील. जैन समुदायाच्या तीव्र विरोधामुळे आणि धार्मिक भावनांचा आदर करत बिल्डर विशाल गोखले यांनी या व्यवहारातून माघार घेत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, जोपर्यंत हा व्यवहार अधिकृतपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा समाजाने दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement