Pune : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग ग्रंथ आता इंग्रजीतही : ABP Majha
Continues below advertisement
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग हा ग्रंथ आता इंग्रजीतही वाचता येणार आहे.. देहूतील मुख्य मंदिरात हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकरांची उपस्थिती होती. डॉ रामकृष्णदास महाराज लहवितकरांनी मराठीत हा ग्रंथ लिहिला आहे. तर प्राध्यापक डॉ. विजय पाटील यांनी या ग्रंथाचं भाषांतर इंग्रजीत केलंय.. त्यामुळे इंग्रजी वाचकांसाठीही हा ग्रंथ उपलब्ध असणार आहे.
Continues below advertisement