Pune Helmet Rule In Pune : पुण्यात हेल्मेटसक्ती नाही, जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
अनेक पुणेकरांच्या डोक्यावरचा भार हलका होईल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. कारण पुण्यात तूर्तास कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलंय.. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांच प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुखांनी म्हटलय. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयानं काढलेल्या परिपत्रकानंतर, पुण्यात हेल्मेट सक्ती लागू झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र पुण्यात हेल्मेटसक्ती नसेल असं स्पष्टीकरण आता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीच दिलंय...
Continues below advertisement