Pune Heavy Rain: पुण्यात जलप्रलय, वाहने बुडाली, घरात पाणी, लाखोंचे नुकसान!
मराठवाड्याप्रमाणे पुण्यातही जोरदार पाऊस झाला. रविवारपासून पुण्यात अनेक भागात सरासरी साठ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. कात्रज, शिवाजीनगरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पुणे सोलापूर रोडवरील लोणी आणि वाक वस्ती भागात अनेक वाहने पाण्याखाली गेली. काही घरांमध्येही पाणी शिरले. एका नागरिकाने सांगितले की, "आमच्या घरात चार फूट पाणी शिरले होते, लाखो रुपयांचे नुकसान झाले." घरातले सामान पाण्यात बुडाले. रात्री दोन वाजल्यापासून घरात पाणी शिरले होते. ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही पाणी आले होते. रस्त्यांवर नदी वाहत असल्यासारखी परिस्थिती होती. शहर परिसरात काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत अग्निशमन दलाकडे दहा ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांची नोंद झाली. या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.