Pune Foreigner Accident : पुण्यात परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन, नेमकं प्रकरण काय? ABP MAJHA
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Hit and Run Case : परदेशी पर्यटकांनी नाशकात हिट अँड रन केल्याचा प्रकार समोर आलाय. परदेशी महिलेने रिक्षा चालवत एका दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. नाशकातील नारायण गाव येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानंतर विदेशी पर्यटकांनी पळ काढला होता. मात्र, सध्या विदेशी पर्यटक पोलिसांच्या देखरेखेखाली आहेत.
घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले
अधिकची माहिती अशी की, परदेशी पर्यटकांनी धडक दिल्याने दुचाकीस्वार असलेल्या नारायण गावच्या बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झालाय. दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले आहेत. सध्या चारही पर्यटक नारायण गाव पोलिसांच्या निगरानीत आहेत. परदेशी पर्यटकांनमध्ये तीन पुरुष दोन महिलांचा समावेश आहे.
पोलिसांकडून हॉटेल बाहेर बंदोबस्त
नारायण गाव पोलिसांकडून संशयित पर्यटकांना नोटीस बजावण्यात आली आहे. रात्री ताब्यात घेता येत नसल्याने उद्या सकाळी नारायण गाव पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत. परदेशी पर्यटक पळून जाऊ नये म्हणून नाशिक आणि नारायण गाव पोलिसांकडून हॉटेल बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती आले आहे.