Pune Flood News : पुण्यातील नुकसानग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर सुरु; ABP Majha च्या बातमीचा इम्पॅकट

Continues below advertisement

Pune Flood News : पुण्यातील नुकसानग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर सुरु; ABP Majha च्या बातमीचा इम्पॅकट

ही बातमी पण वाचा

Murlidhar Mohol On Pune Rain: 'खडकवासल्यातून पाणी सोडण्याआधी नागरिकांना सतर्क करणं गरजेचं होतं', मुरलीधर मोहोळांनी मान्य केली यंत्रणांची चूक

Pune Rain: पुण्यातील पुरस्थिती आता ओसरली आहे. अनेक भागामध्ये पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. या भागात काल उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाहणी केली त्यांनतर आज खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांनी पाहणी केली. यावेळी एबीपी माझाशी बोलताना खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) पुण्यातील पुरस्थिती आणि नागरिकांचे हाल यामध्ये यत्रंणाची चूक आहे हे मान्य केलं आहे. 

खडकवासला धरणातून अचानकपणे विसर्ग वाढवण्यात आला. त्यानंतर नदीपात्रातील पाणी वाढलं त्याचा फटका अनेक सोसायट्या, घरे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. पाण्याचा विसर्ग वाढवल्याची पुर्वकल्पना दिली गेली नाही. याबाबत एबीपी माझाशी बोलताना खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) म्हणाले, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार होता तर त्याची पुर्वकल्पना देणं फार महत्त्वाचं होतं. हा समन्वयाचा अभाव आहे. निश्चितच आम्ही त्याच्या खोलापर्यंत जाणार आहोत. यामध्ये कोणाची चूक असेल त्याला आम्ही सोडणार नाही, असंही ते पुढे म्हणालेत.

काल पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) खडकवासला धरण भरल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचलं, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि रहिवाशांनी प्रशासनाने पुर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग वाढवला त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असा आरोप केला होता. त्यावर आज मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram