Pune Flood | खडकवासला धरणातून विसर्ग, मुठा नदीला पूर, वाहतुकीवर परिणाम!
Continues below advertisement
पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. सध्या पंचवीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम शहरातील डेक्कन परिसरात दिसून येत आहे. बाबा भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पूल परिसरातील वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. काही भागांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. खडकवासला धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे मुठा नदीपात्राच्या परिसरात संपूर्ण पुराची परिस्थिती उद्भवलेली आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement