Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

Continues below advertisement

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची (Maharashtra Vidhansabha Election) मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे. बहुतांश ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, काही ठिकाणी कमी मतदान झालं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झालं आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंतर आता उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदारांनी मताचं दान कोणाच्या पारड्यात टाकलं हे जरी 23 नोव्हेंबरला समजणार असलं तरीदेखील एक्झिट पोलचे ( Exit Polls) आकडे समोर आले आहेत. यामध्ये कोकणात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबतची माहिती दिली आहे. 

कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात अनेक दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर मंत्री अदिती तटकरे, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, नितेश राणे आणि निलेश राणे असे नेते निवडणुकीच्या मैदानात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram