Pune Drunk Driving : मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलच्या कारने सहा गाड्यांना उडवले
Continues below advertisement
पुण्यातील रांजणगाव (Ranjangaon) येथे एका मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलने (Police Constable) केलेल्या अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. या प्रकरणात, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे (Hemant Iname) याला अखेर अटक करण्यात आली असून त्याला पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले आहे. 'हेमंत इनामे यांनी आपल्या ताब्यातील किया चारचाकी वाहन हे बेदरकार व निष्काळजीपणाने चालवत यशवंत चौकामध्ये पुणे नगर रोडवरती असणाऱ्या रिक्षा तसेच इतर वाहनांना धडक दिली,' अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरुवातीला रांजणगाव पोलिसांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर कारवाई करण्यात आली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. आरोपी हेमंत इनामेविरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement