Pune Cyber Crime : पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; वर्षभरात 669 कोटींचा फ्राॅड
Pune Cyber Crime : पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; वर्षभरात 669 कोटींचा फ्राॅड
वाढती सायबर गुन्हेगारी सध्या तपास यंत्रणांसमोरची डोकेदुखी ठरतेय. त्यात गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी एक नवा फंडा सुरु केलाय. तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. याच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आतापर्यंत राज्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. पोलिस किंवा तपास अधिकारी असल्याचं सांगून हे गुन्हेगार फोन किंवा व्हिडीओ कॉल करतात. आतापर्यंत अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या या नव्या चक्रव्यूहात अडकल्याचं समोर आलंय.
वस्तूंची खरेदी ते वेगवेगळ्या बिलांचा भरणा,तिकीट काढणं किंवा पॉलिसी विकत घेणं हे सगळे व्यवहार तुम्ही आज घरबसल्या करु शकता. पण हे व्यवहार करताना सावध राहा. कारण तुमच्यावर नजर आहे सायबर दरोडेखोरांची आणि त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी आणलाय एक नवा फंडा... डिजिटल अरेस्ट.
मुंबईच्या ताडदेवमधील एका व्यक्तीनं डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकून तब्बल 35 लाख रुपये गमावले आहेत. तर गुजरातच्या एका व्यक्तीलाही असाच आर्थिक फटका बसलाय. ही झाली फसवणुकीची उदाहरणं. पण ही फसवणूक नेमकी कशी होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात एका व्हिडीओतूनही सांगितलं आहे.