Zero Hour : पुण्यात गुन्हेगारीचा भस्मासुर, प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल

Continues below advertisement
राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांनी पुण्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यांना दुजोरा देत, जगताप यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत पुण्याची गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. भाजपने पोलिसांची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि राज्यात व देशात सत्ता आल्यापासून परिस्थिती बिघडल्याचा आरोप त्यांनी केला. अनिल परब यांनी ७० टोळ्यांचा उल्लेख केला असला तरी, प्रत्यक्षात १५० ते २०० गुन्हेगारी टोळ्या पुणे शहरात सक्रिय असल्याचा दावा जगताप यांनी केला. सामान्य माणसाला जामीन मिळायला उशीर लागतो, पण गुन्हेगार दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाहेर येतात. तपास अधिकारी जामिनासाठी अनुकूल भूमिका घेत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. "त्यामुळे पुण्याची छवी आता कधीकाळी नागपूर आणि मुंबईचा नाव घेतलं जायचं. पण आज क्राईम रेटमध्ये अर्थात देशाच्या गुणवंतांकडे असते त्या ठिकाणी जी यादी त्यात गुन्हेगारीमध्ये पुण्याचा नंबर आहे, देशामध्ये पहिला नंबर आहे कारण त्याचे महापाप माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पक्षाचा आहे," असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola