Pune Crime : पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!

Continues below advertisement

Pune Crime  :  पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!  पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न  फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरची रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घटना   ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना घडला प्रकार  आरोपी संजय फकिरा साळवे  राहणार- पिंपरी चिंचवड(मूळगाव- जालना) याला पोलिसांनी घेतल ताब्यात,आरोपीने दारू पिऊन कृत्य केलं असल्याची माहिती  विश्रामबाग पोलिसांनी केला गुन्हा दाखल करत केली आरोपीला अटक  पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला  पोलिस अधिक तपास करत आहेत

विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात (Pune News) नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता संपूर्ण राज्याला पडलाय. पुण्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) पुन्हा एकदा हादरला आहे. पुण्यात महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण पुणेच नव्हेतर अवघा महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे. आरोपी संजय फकिरा साळवे (राहणार : पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना)) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram