Pune Congress : पुणे-बंगळुरु महामार्गाचा दुरवस्थेबद्दल शनिवारी काँग्रेसचं आंदोलन
Pune Congress : पुणे-बंगळुरु महामार्गाचा दुरवस्थेबद्दल शनिवारी काँग्रेसचं आंदोलन
काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा टोल माफ व्हावा , टोल सवलत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाणार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसचे शनिवारी आंदोलन टोल नाका परिसरात चक्काजाम करण्याचं नियोजन तर टोलनाका परिसरात चक्काजाम करून वाहन विना टोल सोडली जाणार आहेत शनिवारी सकाळी दहा वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात कोल्हापूरसह पेठ कराड , सातारा, खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर आंदोलन काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची घोषणा रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याने काँग्रेसचे आंदोलन त्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराड मधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील आनेवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील