Pune Communal Harmony: Eid मिरवणूक पुढे ढकलली, Ganpati Visarjan मुळे Muslim बांधवांचा मोठा निर्णय
पुण्यामध्ये जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. ५ तारखेला ईद आणि ६ तारखेला गणपती विसर्जन एकापाठोपाठ आल्याने मुस्लिम बांधवांनी एकमताने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आणि सामाजिक संस्थांसोबत झालेल्या चर्चेनंतर, ५ तारखेला निघणारी ईदची मिरवणूक (जुलूस) आता ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, "ईद आम्ही ५ तारखेलाच आमच्या घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरी करणार आहोत, पण जुलूस ८ तारखेला काढला जाईल." या निर्णयामुळे दोन्ही सण शांततेत आणि उत्साहात साजरे करता येतील. या निर्णयाला मुस्लिम समाजातील सर्व प्रतिनिधींनी संमती दर्शवली असून, यातून सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला आहे.