Cartoon War: 'डोरेमान म्हणणाऱ्या Ravindra Dhangekar यांना डॉबरमॅन म्हणू शकतो', Navnath Ban यांचा पलटवार

Continues below advertisement
पुण्याच्या राजकारणात (Pune Politics) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावरील आरोपांवरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. 'डोरेमान म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिनवू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही', असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. धंगेकर यांनी एका ट्वीटमधून बन यांना 'डोरेमान' (Doraemon) असे संबोधल्यानंतर हा वाद सुरू झाला. याला प्रत्युत्तर देताना बन यांनी धंगेकरांना त्याच कार्टून मालिकेतील 'नोबिता' (Nobita) या पात्राची उपमा दिली. 'ते बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहेत', असा थेट आरोपही बन यांनी केला आहे. या 'कार्टून वॉर'मुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola