Pune Accident: हँडब्रेक ओढल्याने भीषण अपघात, दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू!

Continues below advertisement
पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात झालेल्या भीषण अपघातात (Pune Accident) ऋतिक भंडारे (Ritik Bhandare) आणि यश भंडारे (Yash Bhandare) या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला, तर खुशवंत टेकवणी (Kushwant Tekwani) हा तरुण गंभीर जखमी आहे. 'हँडब्रेक ओढल्यानं गाडीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिलरला जाऊन धडकलीय', अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास बंट गार्डन मेट्रो स्टेशनजवळ (Bund Garden Metro Station) हा अपघात घडला. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की तिचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणि सिगारेट्स सापडल्याने 'ड्रंकन ड्राईव्ह'चा संशय व्यक्त केला जात आहे. कोरेगाव पार्क परिसरात अनेक पब्स असल्याने रात्रीच्या वेळी वेगाने गाड्या चालवल्या जातात, त्यामुळे पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV footage) आधारे गाडीचा वेग आणि अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola