Pune Car Accident Case : ब्लड सॅम्पल कचरा कुंडीत, धनाढ्य बापाच्या लेकासाठी 'ससून'मध्ये कट

Continues below advertisement

Pune Car Accident Case : ब्लड सॅम्पल कचरा कुंडीत, धनाढ्य  बापाच्या लेकासाठी 'ससून'मध्ये कट

पुणे :  पुण्यात दारुड्या पोरानं दोघांचे बळी (Pune Accident)  घेतल्याच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असताना आता ससून रूग्णालयाच्या दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय. पुण्यातल्या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट (Blood Report) खूप महत्वाचा आहे. तो पॉझिटिव्ह असेल तरच अग्रवालच्या दिवट्याविरुद्ध खटला मजबूत होणार आहे. कदाचित याची कल्पना अग्रवाल कुटुंबियांनी होती म्हणूनन लेकाला वाचवण्यासासाठी वडिलांनी प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. ब्लड सँपल बदलण्यासाठी विशाल अग्रवालने (Vishal Agrawal)  डॉक्टरांना पैशाचे आमिष दिले.  लाडोबाचे वडिल  विशाल अग्रवालच्या फोनवर डॉक्टर अजय तावरेचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातून पहिलाच रिपोर्ट अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा आल्याने संशय बळावला होता. 

 ब्लड रिपोर्ट फेरफारप्रकरणी लाडोबाचे वडिल विशाल अग्रवालला अटक होण्याची शक्यता आहे.  विशाल अग्रवाल विरोधात आणखी एक प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आले आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या ब्लड रिपोर्ट फेरफार केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. विशाल अग्रवालने अजय तावरे याला फोन  केले होते. पोलिसांना या विषयी चौकशी करायची आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram