Sanjay Raut भाजपच्या निशाण्यावर, कोथळा काढण्याच्या वक्तव्याप्रकरणी भाजप पोलिसात तक्रार देणार
संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केले. त्याविरोधात भाजपाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही. समोरून कोथळा काढतो, त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केली असती का? या वक्तव्यावर आक्षेप घेत डेक्कन पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज देणार आहेत.