Pune : पुण्यात भाजपचा 'निर्भय बनो' कार्यक्रमाला विरोध, निखील वागळेंच्या मोदींबद्दल ट्विटनंतर विरोध
Pune : पुण्यात भाजपचा 'निर्भय बनो' कार्यक्रमाला विरोध, निखील वागळेंच्या मोदींबद्दल ट्विटनंतर विरोध
महाराष्ट्रातील पुरोगामी कार्यकर्त्यांकडून राज्यभरात निर्भय बनो हा कार्यक्रम राबवण्यात येतोय या कार्यक्रमात पत्रकार निखील वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे सहभागी होतायत. पुण्यातील साने गुरुजी स्मारकात शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मात्र निखील वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या ट्विटनंतर भाजपने या कार्यक्रमास विरोध केलाय आणि या कार्यक्रमास पोलीसांनी देऊ नये अशी मागणी केलीय. पोलीसांनी मात्र या कार्यक्रमास सशर्त परवानगी दिलीय. या कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषणे आणि वक्तव्यं करण्यात येऊ नये अशा सुचना कार्यक्रमाच्या आयोजकांन दिल्यात. मात्र भाजपन हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिलाय. त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या कार्यक्रमास पोलीसांनी सुरक्षा न पुरवल्यास आम्ही या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू अस म्हटलय. कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा कार्यक्रम होण्यासाठी आपण सुरक्षा पुरवणार असल्याच म्हटलय. यामुळे पुण्यातील या कार्यक्रमावेळी दोन्ही बाजुने कार्यकर्ते समोर येऊ नयेत याची खबरदारी पोलीसांना घ्यावी लागणार आहे.