Pune ATS Raids | कोंढव्यासह 18 ठिकाणी 'Terror' कारवायांवर ATS ची छापेमारी

Continues below advertisement
पुण्यात ATS आणि पोलिसांनी कोंढव्यासह खडकी, वानवडी, भोसरी या 18 ठिकाणी छापेमारी केली आहे. ही कारवाई 2022 आणि 2023 मधील दहशतवादी कारवायांच्या संदर्भात करण्यात आली. 2023 मध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे केलेल्या तपासाच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाने ही मोठी छापेमारी केली. या परिसरातील एकूण 19 संशयितांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. तसेच, या संशयितांची सखोल चौकशी देखील करण्यात आली. पुण्यात अचानक झालेल्या या मोठ्या छापेमारीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दहशतवादी कारवायांच्या तपासाचा हा एक महत्त्वाचा भाग असून, यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola