Pune ATS Raid: कोंढवा परिसरात १९ ठिकाणी छापेमारी, देशभरात खळबळ

पुण्यातील कोंढवा परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलं. या कारवाईने केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती. त्यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आलं होतं. त्याच भागात आता पुन्हा काही संशयित तपास यंत्रणांच्या नजरेत आले आणि पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. पुणे पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसनं एकाच वेळी १९ ठिकाणी छापेमारी सुरू केली. दोन हजार तेवीस मध्ये पुण्यात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची चौकशी सुरू झाली आणि त्यानंतर तपास यंत्रणेचं लक्ष पुण्यातील कोंढव्याकडे वळालं. दोन वर्ष तपास यंत्रणेनी या दहशतवाद्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांवर पाळत ठेवली. पुण्यातलं कोंढवा, खडकी, वानवडी आणि खडक या परिसरात पोलिसांची कारवाई सुरू होती. पोलिसांनी एकोणीस जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली होती. मुंबई, पुणे आणि गुजरातमध्ये घातपात घडविण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. कोल्हापूर आणि साताऱ्याच्या जंगलात बॉम्ब स्फोटाची चाचणीही झाली. पुण्यातील कोंढवामध्ये बॉम्ब निर्मितीचं प्रशिक्षण घेतल्याचेही उघड झालं. दिवाळी आणि निवडणुका तोंडावर असल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola