Alandi Sanchar Bandi | देवाच्या आळंदीत उद्यापासून 14 डिसेंबरपर्यंत संचारबंदी
देवाच्या आळंदीत 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू होणार आहे. 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे. या प्रसंगी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. पण यंदा कोरोनाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे यंदाचा संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह कमीतकमी 20 ते जास्तीतजास्त 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतच पार पडेल.